Trending Video:वा रं पठ्ठ्या ! भक्तीगीतावर चिमुकल्याचे जबरदस्त एक्स्प्रेशन; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक

Trending Video:वा रं पठ्ठ्या ! भक्तीगीतावर चिमुकल्याचे जबरदस्त एक्स्प्रेशन; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक

Trending Video: हल्लीची लहान मुलं पटकन नवनवीन गोष्टी शिकतात, अनेकदा अभ्यासापेक्षा त्यांचे सोशल मीडियाच्या ट्रेंडवर अचूक लक्ष असते. एखादे नवीन गाणे आले की ते त्यांच्या नेहमीच तोंडपाठ असते, रील्समधील गाणी ते नेहमी पटापट बोलतात.

सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्येदेखील असाच एक लहान गोड मुलगा एका भक्तीगीतावर अभिनय करताना दिसतोय, जे पाहून नेटकरी कौतुक करताना दिसतायत.

सोशल मीडियावर कधी कुठलं गाणं, कुठला व्हिडीओ व्हायरल होईल हे सांगता येत नाही. जेव्हापासून रील्स बनवण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे, तेव्हापासून सतत विविध भाषेतील, विविध देशातील नवनवीन गाणी व्हायरल होतात, ज्यावर लाखो लोक रील बनवतात. मोठ्यांप्रमाणेच लहान मुलांनाही सोशल मीडियावर रील्स बनवायला खूप आवडतं. सध्या एका चिमुकल्याचा असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चिमुकला मोबाइलमधील रील्स बघत बघत एका भक्तीगीतावर जबरदस्त एक्स्प्रेशन्स देताना दिसतोय. चिमुकल्याचे हे एक्स्प्रेशन्स पाहून नेटकरी त्याचे प्रचंड कौतुक करताना दिसत आहेत. त्यामुळे त्याचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

वा रं पठ्ठ्या! भक्तीगीतावर चिमुकल्याचे जबरदस्त एक्स्प्रेशन; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक

 

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @payasamhema या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला आतापर्यंत तब्बल दोन मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत. शिवाय याला एक लाखाहून अधिक लोकांनी लाइक केले आहे. तसेच अनेक जण यावर कमेंट्सदेखील करताना दिसत आहेत. यातील एकाने लिहिलंय की, “पॉवर ऑफ कुरकुरे”, तर दुसऱ्याने लिहिलंय की, “भक्तीमय एक्स्प्रेशन.” तर आणखी एकाने लिहिलंय की, “मुलं कोणत्याही गाण्यावर एक्स्प्रेशन्स देऊ शकतात.” तर आणखी एकाने त्याच्या गाण्याचे कौतुक केले आहे

Leave a Comment