Virar news: रत्नागिरीत परीचारिकेचे प्रशिक्षण घेणा-या विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी तीन तरुण ताब्यात
सखोल चौकशी सुरू असल्याची पालकमंत्री उदय सामंत यांची माहिती
रत्नागिरी शहरा जवळील चंपक मैदाना येथे परीचारिकेचे प्रशिक्षण घेणा-या विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी पोलिसांनी तीन युवकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या तरुणांची सखोल चौकशी सुरू असून शेवटपर्यंत जाऊन या प्रकरणाचा तपास करा, अशा सूचना पोलीस खात्याला दिल्या असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
Virar news रत्नागिरीत परीचारिकेचे प्रशिक्षण घेणाऱ्या युवतीवर सोमवारी सकाळी चंपक मैदान येथे अत्याचार करण्यात आल्याचे उघड झाले. या घटनेनंतर लोकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला. संतप्त जमावाने सोमवारी रात्री जिल्हा रुग्णालयात निदर्शने केली. तसेच रस्ता रोको देखील केला होता. शहरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. मंगळवारी सकाळी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात जाऊन पीडित महिलेची आणि तिच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते. या भेटीनंतर बोलताना पालकमंत्री सामंत म्हणाले की, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांना तपास तत्काळ सुरू करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. शेवटपर्यंत जाऊन तपास करा आणि आरोपींचा शोध घ्या अशा सक्त सूचना केल्याची माहिती सामंत यांनी दिली. हा विषय अत्यंत संवेदनशील असून पीडित युवतीने दिलेल्या जबाबानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Virar news; आतापर्यंत पोलिसांनी तीन तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या तरुणांची कसून चौकशी सुरू आहे. पीडित युवतीने सांगितलेल्या मार्गावरील सीसीटिव्हीचे फुटेज पोलिसांच्या ताब्यात घेतले आहे. या फुटेजच्या आधारावर याचा तपास पोलीस करत असल्याची माहिती सामंत यांनी यावेळी दिली.