Shocking video: बनावट टीटीचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. प्रवाशांनी या तरुणीचा भांडाभोड केला असून याचा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.
टीटी बनून ट्रेनमध्ये शिरली अन् फसली; चालाख प्रवाशांनी पाहा कशी केली पोलखोल
Viral video: सर्वसामान्यांच्या अगदी जवळचा विषय म्हणजे लोकल. रेल्वे तिकिटाची किंमतही अगदी क्षुल्लक आणि परवडणारी असते. तरीही काही फुकटे प्रवासी तिकीट काढत नाहीत. काही दिवसांपासून रेल्वेने या फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्यास सुरुवात केलीय. याचाच गैरफायदा घेत गेल्या काही वर्षांत रेल्वेस्थानकांत, लांब पल्ल्याच्या रेल्वेमध्ये तोतया तिकीट तपासनीसांचा सुळसुळाट झाला आहे. एका तरुणीने चक्क टीटीई अर्थात प्रवासी तिकीट परीक्षक बनून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. या बनावट टीटीईचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. प्रवाशांनी या तरुणीचा भांडाफोड केला असून, त्याचा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.
उत्तर प्रदेशातील झांशी येथे पातालकोट एक्स्प्रेसमध्ये ही घटना घडली. संबंधित तरुणीचे हावभाव पाहून प्रवाशांना ती बनावट टीटीई आहे, अशी शंका आली. मग त्यांनी तिची विचारपूस करताच तिचा खरा चेहरा समोर आला. प्रवाशांनी तिला पोस्टिंग आणि इतर बाबींबद्दल विचारले असता, ती बनावट टीटीई गडबडली. मग प्रवाशांचा संशय वाढला आणि सत्य समोर आले. प्रवाशांनी तिला जॉब नंबर आणि इतर काही पुरावे दाखविण्यास सांगितले. आयडी कार्डबद्दल प्रवाशांनी विचारले असता, तरुणीची तारांबळ उडाली.