Viral Video News : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही व्हिडीओ पाहून तर धक्का बसतो. अनेकदा सार्वजानिक ठिकाणी अशा घटना घडतात की ज्याचा आपण विचारही करू शकत नाही. सध्या पेट्रोल पंपावरील असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये पेट्रोल पंपावरील रांगेच्या वादातून दोन तरुणांमध्ये तुफान हाणामारी झालेली दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (Viral Video : two young guys fight on petrol pump)

पेट्रोल पंपावर दोन तरुणांमध्ये तुफान हाणामारी ( two young guys fight on petrol pump))

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की दोन तरुण एकमेकांना बेदम मारहाण करताना दिसत आहे. रांगेच्या वादातून या तरुणांमध्ये हाणामारी झालेली दिसून येत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की हे दोन्ही तरुण एकमेकांच्या अंगावर चढतात व धक्काबु्क्की करतात. यांच्या धक्काबुक्कीत एका काकाची दुचाकी सु्द्धा खाली पडते. पुढे व्हिडीओमध्ये काका सुद्धा संतापलेले दिसतात व एका तरुणाच्या अंगावर धावतात तेव्हा पेट्रोल पंपावरील कर्मचारी धावून येतात आणि सर्वांना दूर करतात. पेंट्रोल पंपावरील लोक ही संपूर्ण हाणामारी बघताना दिसतात.

one more video Old man boarding the st bus through the window see what happens next
VIDEO: “आजोबा जोमात महामंडळ कोमात” सीट पकडण्यासाठी काय केलं पाहा; खिडकी नाही तुटली तर काय झालं पाहा
एका चित्रपटाने मिळवून दिली प्रसिद्धी, पण नंतरचे २० सिनेमे ठरले फ्लॉप; आता ‘हा’ व्यवसाय करतोय बॉलीवूड अभिनेता
VIDEO: बापरे! पाऊस सुरु होता, ​तो फोनवर बोलत होता अन् वीज कोसळली, क्षणात जे घडलं त्यावर विश्वास बसणार नाही
हद्दच झाली! ट्रेनमध्ये एका सीटसाठी महिलेने ओलांडली मर्यादा; VIDEO पाहून संतापले लोक
Bangladesh Violence Update: “आम्ही भारताला यासाठी माफ करू शकत नाही”, नोबेल विजेते मोहम्मद युनूस यांचा संताप; म्हणाले, “माझ्या भावाच्या घरात…”
याला म्हणतात पुणेकरांचा धाक; पठ्ठ्यानं गाडीच्या मागे लिहिलं असं काही की PHOTO पाहून पोट धरुन हसाल
Banana Leaf : केळीच्या पानांच्या प्लेट्स कशा बनवल्या जातात माहिती आहे का? VIDEO तून पाहा झलक; नेटकरी म्हणाले, ‘प्लास्टिकच्या…’
Yashashree Shinde Murder Case : “यशश्री शिंदेच्या अंगावर दोन टॅटू, एकावर दाऊदचं नाव, दुसऱ्या..” पोलिसांनी नेमकं काय सांगितलं?

युजर्सच्या प्रतिक्रिया

revangaikwad69 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनवर लिहिलेय, “पेट्रोल भरताना नंबरला उभे राहूनच पेट्रोल भरा”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “होंडावाले बाबा खूप प्रचंड वेगाने गरम झाले आणि पहारपण सुरू केला…” तर एका युजरने लिहिलेय, “भांडण करणारे राहिले एकीकडे आणि व्हिडिओ काढणारा झाला व्हायरल..” आणखी एका युजरने लिहिलेय, “लोकांना कशाची घाई असते कळत नाही. भांडण करत तासभर थांबतील पण असा थोडा पण दम निघत नाही गाडी चालवताना पण” या व्हिडीओवर काही युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.