Viral news maharashtra:महाराष्ट्र हादरला.! तलाठ्याची कार्यालयातच डोळ्यात मिरची पूड टाकून दिवसा ढवळ्या हत्या; व्हॉट्सअॅप चॅटवरुन वाद.

Viral news maharashtra महाराष्ट्र हादरला.! तलाठ्याची कार्यालयातच डोळ्यात मिरची पूड टाकून दिवसा ढवळ्या हत्या; व्हॉट्सअॅप चॅटवरुन वाद.

हिंगोलीमधून एक भयंकर घटना समोर आली आहे. वसमत तालुक्यात एका तलाठ्याच्या डोळ्यात मिर्ची टाकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. व्हॉट्सअॅप चॅटवरुन झालेल्या वादातून हि घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

संतोष पवार असं हत्या केलेल्या तलाठ्याचे नाव आहे. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. प्रताप कराळे असं आरोपी तरुणाचे नाव आहे.

नेमकं काय घडलं?

हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील आडगाव येथील तलाठी संतोष पवार हे त्यांच्या तलाठी कार्यालयात काम करत होते. त्यावेळी आरोपी प्रताप कराळे या तरुणाने कार्यालयात जात व्हाट्सअप्प ग्रुपवरील मेसेजवरुन वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी तलाठी पवार म्हणाले मी योग्यच टाकले जे टाकले आहे, असे प्रत्युत्तर दिले. त्यानंतर प्रताप कराळेने तलाठी पवार यांच्या डोळ्यात थेट मिर्चीची पूड टाकत चाकूने सपासप वार केले.

या घटनेनंतर आरोपी कराळेने घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान, या घटनेत जखमी झालेले तलाठी संतोष पवार यांना तातडीने परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. सर्व अधिकाऱ्यांसमोर पवार यांच्या कुटुंबाने टाहो फोडत आरोपीला फाशी देण्याची मागणी केली. दरम्यान, पोलिसांनी यातील आरोपी प्रताप काळे याला अटक केली आहे.

…म्हणून केला निर्घृण खून

आरोपी संतोष कराळे हा वारंवार तलाठी संतोष पवार यांना तुम्ही माझी जमीन इतरांच्या नावावर करून देताल असे म्हणत त्रास देत असायचा. मात्र, असं करता येत नसतं अस वारंवार सांगूनही आरोपीने ऐकले नाही. त्याने आज थेट पवार यांचा निर्दयीपणे खून केला. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Leave a Comment