Edible Oil Price : महागाईत सर्वसामान्यांना दिलासा! खाद्यतेलच्या किमतीत होणार घट…

Edible Oil Price : महागाईत सर्वसामान्यांना दिलासा! खाद्यतेलच्या किमतीत होणार घट…

Edible Oil Price:महागाईने त्रस्त असणाऱ्या सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गृहिणींसाठी सरकाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. खाद्यतेलाच्या किमती अधिक कमी होणार अशी खुशखबर महिलांना सरकारने दिली आहे.

सरकारने अन्न सचिवालयासोबत महत्त्वाची बैठक घेतली असून मिळालेल्या माहीतीनुसार, तेलाच्या किमतीत लवकरच घट्ट होणार आहे. केंद्र सरकारने जागतिक बाजारपेठेतील खाद्यतेलाच्या किमती (Price) या किरकोळ घसरतील. प्रति लिटर तेलाच्या किमतीत ८ ते १२ रुपयांनी कपात करावी असे केंद्र सरकारकडून (Government) सांगण्यात आले आहे.

खाद्यतेलाच्या प्रमुख आयातदरा असलेल्या भारताने २०२१-२२ वर्षी १.५७ लाख कोटी रुपयांची आयात केली होती. मलेशिया व इंडोनेशिया येथून पामतेल खरेदी करते तर सोयाबीनचे तेल अर्जेंटिना आणि ब्राझीलमधून आयात केले जाते.

मिळालेल्या माहीतीनुसार उत्पादक व रिफायनर्सने वितरकांनी दिलेली किंमत लगेच कमी करणे आवश्यक आहे. ज्यामुळे कपातीचा दर दिसून येते. जेव्हा जेव्हा रिफायनर्स विक्रेते तेलाच्या किमती कमी करतात तेव्हा त्याचा फायदा सर्वसामान्यांना दिला जावा असे सांगण्यात आले आहे.

1. खाद्यातेलाच्या दरात सात्त्याने घसरण सुरुच

खाद्यतेलाच्या किमतीतील घसरणीचा कल हा कायम आहे त्यात आणखी कपात होण्याची तयारी केली जात आहे. घरगुती ते खरेदीदारांसाठी खाद्यतेलासाठी कमी किंमत देण्याची अपेक्षा करण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडस्ट्री बॉडीने खाद्यतेलाची एमआरपी आणखी कमी करण्याची ऑफर दिली आहे आणि आगामी काळात ग्राहक खाद्यतेलाच्या किमती कमी होण्याची अपेक्षा करू शकतात.

Leave a Comment